मुंबईच्या प्रत्येक पोलिस स्टेशनला आता सायबर गुन्हे नोंदवण्याची सोय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे, आता मुंबईच्या प्रत्येक पोलिस स्टेशनला आता सायबर गुन्हे नोंदवण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळं सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत नेमकं कुठं जावं असा प्रश्न नागरीकांना पडणार नाही. दिवसेंदिवस वाढत्या सायबर गुन्हेगारीचं स्वरुप बघता मुंबईच्या प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये सायबर गुन्हे तपास आणि प्रतिबंध कक्ष लवकरच तयार […]

मुंबईच्या प्रत्येक पोलिस स्टेशनला आता सायबर गुन्हे नोंदवण्याची सोय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे, आता मुंबईच्या प्रत्येक पोलिस स्टेशनला आता सायबर गुन्हे नोंदवण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळं सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत नेमकं कुठं जावं असा प्रश्न नागरीकांना पडणार नाही.

दिवसेंदिवस वाढत्या सायबर गुन्हेगारीचं स्वरुप बघता मुंबईच्या प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये सायबर गुन्हे तपास आणि प्रतिबंध कक्ष लवकरच तयार करण्यात येणार आहे. यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना  प्रशिक्षणही देण्यात येतंय.

आतापर्यंत मुंबईत एकच सायबर पोलिस स्टेशन होतं, नागरीकांसाठी तिथं येवून गुन्हा नोंदनवणं प्रत्येक वेळी शक्य होत नव्हतं. त्यामुळं सायबर गुन्हे नोंदले जाण्याचं प्रमाणही कमी होतं आणि एकाच पोलिस स्टेशनवर या गुन्ह्यांची उकल करण्याची जबाबदारी होती. पण आता प्रत्येक पोलिस स्टेशनलाच ही सुविधा उपलब्ध करुन दिली जात असल्यानं नागरीकांना गुन्हा नोदवणं सोपं जाणार आहे. गुन्हा सिद्ध होण्याचं प्रमाणही वाढणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number