भारताची पदकांची लयलूट सुरूच, सीमा पुनियाला रौप्यपदक

वृत्तसंस्था, मुंबई राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची पदकांची लयलूट सुरूच आहे. थाळीफेक प्रकारातील दोन पदकांसह भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील अथलेटिक्सच्या पदकांचे खाते उघडले. सीमा पुनिया आणि नवजीत कौर ढिल्लन यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले. सीमाने कारकीर्दीतील सलग चौथ्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची किमया साधताना पहिल्याच प्रयत्नात 61.41 मीटर ही कामगिरी नोंदवली, तर नवजीतने अखेरच्या प्रयत्नात 57.43 मीटर […]

भारताची पदकांची लयलूट सुरूच, सीमा पुनियाला रौप्यपदक

वृत्तसंस्था, मुंबई

राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची पदकांची लयलूट सुरूच आहे. थाळीफेक प्रकारातील दोन पदकांसह भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील अथलेटिक्सच्या पदकांचे खाते उघडले. सीमा पुनिया आणि नवजीत कौर ढिल्लन यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले.

सीमाने कारकीर्दीतील सलग चौथ्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची किमया साधताना पहिल्याच प्रयत्नात 61.41 मीटर ही कामगिरी नोंदवली, तर नवजीतने अखेरच्या प्रयत्नात 57.43 मीटर अंतरावर थाळी फेकली. माजी विश्वविजेत्या डॅनी स्टीव्हन्सने (ऑस्ट्रेलिया) 68.26 मी. थाळीफेक करीत स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदक पटकावले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number