श्रीरामपूर तालुक्यातील वाकडी येथील आयटी इंजिनियरने मेहनतीने फुलवली पांढऱ्या जांभळाची शेती जांभळाच्या शेतीतून सध्या एकरी घेतले 3 लाख 25 हजार रूपयांचे उत्पन्न. यापूर्वी काळ्या रंगाचे कलिंगड पिवळे झाले हे पाहिले होते. जांभूळ जांभळ्या रंगाचे असते. परंतु पांढऱ्या रंगाची जांभूळ बाग फुलवून लाखो रुपयांची उत्पन्न घेण्याची किमया करून वाकडी येथील एका युवकाने आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून वडिलोपार्जित शेती फुलवली आहे.
श्रीरामपुर तालुक्यातील वाकडी येथील विक्रांत काले यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांनी तालुक्यात पहिल्यांदा सफरचंदाची बाग लावून यशस्वीही केली. त्यानंतर त्यांनी आता पांढऱ्या रंगाचे जांभूळ बाग केली. तीन वर्षांपूर्वी 12 बाय 12 फुटावर झाडे लावली होती. एकरी 325 झाडे वसली. तीन वर्षे नंतर पीक घेतले. आता झाडाला फळे आली. त्यांनी फळे काढून साधारण 250 रुपये किलो भावाने विक्री सुरू केली. एका झाडाला पहिल्या वेळी सात ते आठ किलो फळे शिवारात मिळाली असून पाच वर्षांनंतर 25 किलो फळे मिळू शकतात, असे काले यांनी सांगितले. जांभूळ झाड 25 वर्षे टिकते. आता त्यांना प्रतिझाड किमान एक हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे. सध्याचा भाव लक्षात घेता एकरी लाख 25 हजार रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
गापिटीलाही कमी बळी पडते हे जांभळाचे वाण
हे जांभूळ कोणत्याही प्रकारच्या जमिनीत व कमी पाण्यात येते. शिवाय फळे पानांच्या आत असल्याने गारपिटीने नुकसान होत नसल्याचा अनुभव त्यांना यावर्षी आला आहे. शिवाय झाडांची उंची कमी असल्याने तोडणी, फवारणी व मशागतीची कामे सोपी होतात.
पांढऱ्या जांभूळ शेती करण्यासाठी कमी खर्च येतो
पांढऱ्या जांभूळ बाग उभी करण्यासाठी कमी खर्च येतो. नैसर्गिक आपत्तीलाही कमी बळी पडते. त्यामुळे कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवण्याचा चांगला पर्याय आहे. रोपे उपलब्ध करणे, लागवड तंत्रज्ञान माहिती देणे, विक्री व बाजारपेठ याबाबत आपण इच्छुक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू असही काले सांगतात. बाग उभी करण्यासाठी एकदाच मशागत, रोपे, खते, औषधे गृहीत धरून एकरी साधारण दीड ते दोन लाख रुपये खर्च झालाय.