जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई हे शहर महिलांसाठी सुरक्षित मानलं जातं, पण गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना बघितल्या तर खरच हे शहर महिलांसाठी सुरक्षित आहे का असा प्रश्न
कोणलाही पडेल.
एक तरुणी सीएसटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वर उभी होती. तेव्हा तपोवन एक्स्प्रेसमधला एक तरुण या मुलीकडे रोखुन बघत हस्तमैथुन करायला लागला.
ट्रेनमध्ये अंधार आणि प्लॅटफॉर्म वर कोणीच नाही पाहुन या तरुणाने अश्लील चाळे करायला सुरुवात केली.
मुलीसमोरच हा सगला प्रकार सुरु झाल्यामुळे घाबरलेली मुलगी दुसरीकडे जाऊन उभी राहीली पण पुन्हा तिच्यासमोर असणाऱ्या बोगीत जाऊन चाळे करु लागला.
म्हणून तिने त्याचा व्हीडिओ सुद्धा काढला. हे सगळं तिने पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनीही सुरुवातीला तिच्याकडे दुर्लक्ष केलं.
इतकच नाही तर त्याच्याकडे दुर्लक्ष करुन तुम्ही दुसरीकडे जा असं या तरुणीला पोलिसांनी सांगितले. कसाबसा एक पोलिस या तरुणीसोबत दिसल्यावर या तरुणाने पळ
काढला.
पण, पोलिसांनी मात्र त्या तरुणावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यांमुळे पोलिसचं या घटनांकडे गांभिर्याने बघत नसतील तर महिलांनी तक्रार करायची कुठे हा प्रश्न
उपस्थित होतो.