CRPF Constable Recruitment: खाकी वर्दीचं स्वप्न आता होणार पूर्ण! CRPF मध्ये नऊ हजारांहून अधिक पदांसाठी मेगाभरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची प्रक्रिया

अर्ज प्रक्रिया 20 एप्रिल ते 19 मे 2026 दरम्यान होणार आहे. 10 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

CRPF Constable Recruitment: खाकी वर्दीचं स्वप्न आता होणार पूर्ण! CRPF मध्ये नऊ हजारांहून अधिक पदांसाठी मेगाभरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची प्रक्रिया

नवी दिल्ली: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force, CRPF) मध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी भरतीची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे हजारो पदे भरली जाणार असून, सुरक्षा दलात सामील होण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अर्ज प्रक्रिया 20 एप्रिल 2026 पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मे 2026 निश्चित करण्यात आली आहे.

एकूण पदांची माहिती

या भरती प्रक्रियेत एकूण 9,175 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. यामध्ये 9,096 पदे पुरुष उमेदवारांसाठी, तर 79 पदे महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. टेक्निकल, ट्रेड्समन तसेच पायनियर विंगमधील पदांचा यात समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही विशिष्ट पदांसाठी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र किंवा अनुभव आवश्यक आहे, जसे की ड्रायव्हर आणि मेकॅनिक पदांसाठी.

वयोमर्यादा आणि सवलत

वयोमर्यादेबाबत, ड्रायव्हर पदासाठी 21 ते 27 वर्षे, तर इतर पदांसाठी 18 ते 23 वर्षे वयोगट निश्चित करण्यात आला आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

हेही वाचा: RBI New Rule: डिजिटल फसवणुकीला बसणार लगाम: 10,000 पेक्षा मोठ्या व्यवहारांवर आता 1 तासाचा 'होल्ड'; काय आहे RBI चा नवा नियम?

शारीरिक निकष

भरती प्रक्रियेत शारीरिक निकषांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. पुरुष उमेदवारांची किमान उंची 170 सेंटीमीटर, तर महिला उमेदवारांची 157 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. पुरुषांसाठी छातीचे माप 80 सेंटीमीटर निश्चित करण्यात आला आहे. धावण्याच्या चाचणीत पुरुष उमेदवारांना पाच किमी अंतर 24 मिनिटांत पूर्ण करावे लागेल, तर महिलांना 1.6 किलोमीटर अंतर 8.5 मिनिटांत पूर्ण करणे आवश्यक आहे.

 निवड प्रक्रिया 

निवड प्रक्रिया अनेक टप्प्यांत पार पडणार आहे. सर्वप्रथम शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि शारीरिक मापदंड चाचणी घेतली जाईल. त्यानंतर संगणक आधारित परीक्षा होईल. पुढील टप्प्यात ट्रेड टेस्ट, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल. अंतिम गुणवत्ता यादी (मेरिट लिस्ट) ही CBT मधील गुणांच्या आधारे तयार केली जाणार आहे.

लेखी परीक्षेचे स्वरूप

लेखी परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारले जातील, जे 100 गुणांचे असतील. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल. यात रीजनिंग, सामान्य ज्ञान, गणित, हिंदी आणि इंग्रजी विषयांचा समावेश असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांचे निगेटिव्ह मार्किंग लागू राहील.

अर्ज प्रक्रिया आणि शुल्क

अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी प्रथम नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावी लागेल. त्यानंतर अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अर्ज शुल्क भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा आणि त्याची प्रिंट काढून ठेवावी. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला उमेदवार आणि माजी सैनिकांना शुल्कात सवलत देण्यात आली आहे.

ही भरती प्रक्रिया देशसेवेची सुवर्णसंधी ठरणार असून, पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.  

हेही वाचा: Justice Yashwant Varma Resignation: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; रोख रक्कम घोटाळ्यानंतर राष्ट्रपतींकडे पदत्याग

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number