गेटवे ऑफ इंडियाला तडे

१०० वर्षांच्या इतिहासासह दिमाखदारपणे उभा आहे गेटवे ऑफ इंडिया. दक्षिण मुंबईतील समुद्रकिना-याजवळ असलेल्या गेटवे ऑफ इंडियाचं अस्तित्व मात्र आता धोक्यात आलंय. गेटवे ऑफ इंडिया हे भारतातील माया शहर मुंबईतील एक ऐतिहासिक प्रवेशद्वार आहे. विसाव्या शतकात इंग्लंडचे प्रिन्स जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या भारत भेटीदरम्यान, त्यांच्या स्वागतासाठी ते बांधले गेले. परंतू मुंबईच्या या ऐतिहासिक प्रवेशद्वाराची […]

गेटवे ऑफ इंडियाला तडे

१०० वर्षांच्या इतिहासासह दिमाखदारपणे उभा आहे गेटवे ऑफ इंडिया. दक्षिण मुंबईतील समुद्रकिना-याजवळ असलेल्या गेटवे ऑफ इंडियाचं अस्तित्व मात्र आता धोक्यात आलंय. गेटवे ऑफ इंडिया हे भारतातील माया शहर मुंबईतील एक ऐतिहासिक प्रवेशद्वार आहे. विसाव्या शतकात इंग्लंडचे प्रिन्स जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या भारत भेटीदरम्यान, त्यांच्या स्वागतासाठी ते बांधले गेले. परंतू मुंबईच्या या ऐतिहासिक प्रवेशद्वाराची आता दयनीय अवस्था झाली आहे.

गेट वे ऑफ इंडियाच्या दुरवस्थेबाबत पुरातत्व विभागाच्या तपासणीत आलेल्या अहवालानुसार गेट वे ऑफ इंडियाच्या पाया आणि भिंतींना भेगा पडल्या आहेत. याव्यतिरिक्त समुद्राच्या लाटांमधून इमारतीमध्ये प्रवेश करणाऱ्या पाण्याचं नंतर बाष्पीभवन होतं, परंतू हे क्षार भेगा आणि खड्ड्यांमध्ये टिकून राहतात. या वास्तूंची जीर्ण झालेली स्थिती दुरुस्त करून सुधारावी, अशी मागणी राज्य पुरातत्व विभागाने राज्य सरकारकडे केली आहे.

गेटवे ऑफ इंडियाचं अस्तित्व धोक्यात ?

दुरुस्ती आणि देखभालीकडे दुर्लक्ष
ग्रेड १ हेरिटेजची अवस्था बिकट
१०० वर्षांचा हा वारसा आता मोडकळीस आला
प्रवेशद्वाराच्या भिंतींवर गवतासह शेवाळ साचले
गेट वे ऑफ इंडियाच्या पाया आणि भिंतींना भेगा
महाराष्ट्राच्या पुरातत्व विभागाच्या पाहणी अहवालात माहिती
तातडीने दुरुस्ती करण्याची शासनाला सूचना
सद्यस्थिती सुधारण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागेल

सर्वेक्षण करणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार, हेरिटेजची सद्यस्थिती सुधारण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागेल, त्यासाठी सरकारकडून तातडीने परवानगी आणि निधीची आवश्यकता आहे. त्यांच्या मते हे काम पावसाळ्यापूर्वी सुरू व्हायला हवे. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी एकूण ६.९ कोटी रुपये खर्च येणार आहे

२०२४ मध्ये गेट वे ऑफ इंडिया वास्तूला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. मात्र शकतपूर्तीच्या आधीच गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तूला तडे गेल्याने चिंता व्यक्त होत आहे. हा वारसा वर्षानुवर्षे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करत आहे.मुंबईच्या अस्मितेसाठी गेट वे ऑफ इंडियाचे स्वतःचे एक अस्तित्व आहे.
मुंबईच्या समुद्र किनारी १९११ मध्ये गेट वे ऑफ इंडिया ही वास्तू बांधण्यात आली. ब्रिटनचे किंग पंचम जॉर्ज आणि त्यांची पत्नी क्वीन मेरी यांच्या भारत भेटीच्या निमित्ताने समुद्रात भर घावून गेट ऑफ इंडिया ही वास्तू उभारण्यात आली. त्यांची भारत भेट ही ऐतिहासिक व्हावी हा त्यामागचा उद्देश होता.

गेटवे ऑफ इंडियाचा नेमका इतिहास काय ?

गेटवे ऑफ इंडियापर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण
देश-विदेशातील पर्यटक भेटीला
इंडो-सारासेनिक शैलीत बांधले स्मारक
प्रवेशद्वाराच्या मध्यवर्ती घुमटाचा व्यास अंदाजे ४८ फूट
प्रवेशद्वाराची उंची ८३ फूट
हिंदू आणि मुस्लीम वास्तूकलेतील कोरीव काम
भव्य इमारतीच्या संरचनेत हिंदू, मुस्लिम स्थापत्य शैलीच्या खुणा
गेटमध्ये स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मुर्त्यासुद्धा
पाचव्या जॉर्जच्या आगमनाच्या वेळी ब्रिटिश काळात बांधले
बांधकाम डिसेंबर १९११ मध्ये सुरू झाले
बांधकाम १९२४ मध्ये पूर्ण झाले.
वास्तूच्या बांधकामासाठी २१ लाख रुपयांचा खर्च

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number