मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकलच्या जादा फेऱ्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आता मुंबईकरांवर प्रभूकृपा झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एक दोन नाही तर तब्बल 75 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. प्लॅटफॉर्मवर उभं राहून लोकलची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.   नवीन फेऱ्यांपैकी मध्य रेल्वेवर 40 आणि पश्चिम रेल्वेवर 35 फेऱ्या असतील. मध्य रेल्वेच्या एकूण 40 फेऱ्यांमध्ये मेनलाइनवर बारा […]

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकलच्या जादा फेऱ्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आता मुंबईकरांवर प्रभूकृपा झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एक दोन नाही तर तब्बल 75 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. प्लॅटफॉर्मवर उभं राहून लोकलची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

 

नवीन फेऱ्यांपैकी मध्य रेल्वेवर 40 आणि पश्चिम रेल्वेवर 35 फेऱ्या असतील. मध्य रेल्वेच्या एकूण 40 फेऱ्यांमध्ये मेनलाइनवर बारा फेऱ्या आणि हार्बर व ठाणे ते वाशी- पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर प्रत्येकी 14 फेऱ्या चालवल्या जातील.

 

नवीन फेऱ्यांचा फायदा ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा येथील प्रवाशांना होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील नवीन 35 फेऱ्यांपैकी दहा फेऱ्या पंधरा डबा लोकलच्या असतील. गांधी जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबरपासून या फेऱ्या सुरु होतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number