विहिरीत पडली जर्सी गाय, वाचवण्यासाठी एकवटले गावकरी

तासगाव तालुक्यातील अंजनी गावात पायऱ्या नसलेल्या विहिरीत पडलेल्या जर्सी गायीला नागरिकांनी मोठे अथक परिश्रम घेऊन बाहेर काढलं आहे.   अंजनी गावातील पांडुरंग पाटील यांच्यां मळयात अगदी गोठ्यानजीक लागून असलेल्या 30 ते 40 फुटाच्या विहीरीत गाय पाय घसरून पडली.    विहिरीत थोड्याफार प्रमाणात पाणी असल्यामुळे गाय विहरीत पडल्यानंतर तिला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र या 40 […]

विहिरीत पडली जर्सी गाय, वाचवण्यासाठी एकवटले गावकरी

तासगाव तालुक्यातील अंजनी गावात पायऱ्या नसलेल्या विहिरीत पडलेल्या जर्सी गायीला नागरिकांनी मोठे अथक परिश्रम घेऊन बाहेर काढलं आहे.

 

अंजनी गावातील पांडुरंग पाटील यांच्यां मळयात अगदी गोठ्यानजीक लागून असलेल्या 30 ते 40 फुटाच्या विहीरीत गाय पाय घसरून पडली. 

 

विहिरीत थोड्याफार प्रमाणात पाणी असल्यामुळे गाय विहरीत पडल्यानंतर तिला गंभीर दुखापत झाली नाही.

मात्र या 40 फूट खोल आणि पायऱ्या नसलेल्या विहिरीतुन या गाईला कसे काढायचे असा प्रश्न या गायीचे मालक पांडुरंग पाटील यांना पडला होता.


या घटनेची माहिती मिळतांच मळ्यातील लोक देखील जमा झाले. त्यानंतर गावकऱ्यांनी कासरे, मोठे बेल्ट आणि गावातीलचं एका जेसीबीच्या साहाय्याने या गाईला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. 

 

तब्बल 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर आणि गावकऱ्यांनी लढवलेल्या शक्कलीनंतर या गायीला विहिरीतुन सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

40 फूट खोल विहिरीत पडून आपली लाखो रुपये किंमतीची गाय सुखरूपपणे विहिरीबाहेर आल्याने गाईच्या मालकाने सुटकेचा निःश्वास सोडला.

मात्र मोठ्या शिताफीने आणि युक्तीने गावकऱ्यांनी ही भली मोठी गाय विहिरीतुन बाहेर काढली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number