‘त्याच्याशी’ लग्नाला नकार, तरुणीवर सुऱ्याचे सपासप वार

लग्न करण्यास नकार दिल्यामुळे मुंब्र्यातील परिसरात एका तरुणीवर तिच्याच मामेभावाने चाकूने आठ वार केल्याची घटना घडली आहे. युवती या घटनेत गंभीररीत्या जखमी झाली असून तिला कळवा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केलंय. युवतीवर वार करून आरोपी युवक फरार झाला असून या घटनेचा तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.   मुंब्रा येथील सम्राट नगर येथे राहणाऱ्या युवतीवर आरोपी […]

‘त्याच्याशी’ लग्नाला नकार, तरुणीवर सुऱ्याचे सपासप वार

लग्न करण्यास नकार दिल्यामुळे मुंब्र्यातील परिसरात एका तरुणीवर तिच्याच मामेभावाने चाकूने आठ वार केल्याची घटना घडली आहे. युवती या घटनेत गंभीररीत्या जखमी झाली असून तिला कळवा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केलंय. युवतीवर वार करून आरोपी युवक फरार झाला असून या घटनेचा तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.

 

मुंब्रा येथील सम्राट नगर येथे राहणाऱ्या युवतीवर आरोपी करण होले याने चाकूने केवळ एक नव्हे, तर आठ वार केले. आरोपी करण होले याने युवतीला लग्नसाठी मागणी घातली होती. मात्र युवती आणि तिच्या घरच्यांनी मुलाला नकार दिल्यामुळे त्याला राग आला होता. हाच राग मनात धरून त्याने युवतीवर हल्ला केला आणि चाकूने तिच्यावर आठ वार केले. मुलीला जखमी अवस्थेत मुंब्र्याच्या खाजगी हॉस्पिटल मध्ये उचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र ती गंभीर जखमी असल्यामुळे तिच्यावर कळवा येथील शिवाजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

या तरुणीला अतिदक्षता विभागात पाठवण्यात आले आहे. युवतीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तरुणीवर वार करणारा आरोपी करण होले सध्या फरार असून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी दोन टीम तयार केल्या आहेत. आरोपी करण होले हा युवतीच्या मामाचाच मुलगा असला, तरी त्याला अटक करण्याची मागणी मुलीच्या नातेवाईकानी केली आहे. दरम्यान घटनेनंतर मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number