जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई हायकोर्टानं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
मुंबईच्या घाटकोपरमधील तानसा पाईपलाईनजवळच्या बेकायदा झोपड्यांवरच्या कारवाईप्रकरणी हे ताशेरे ओढण्यात आले.
राज्याच्या मंत्रिमंडळात असणारा एखादा मंत्री बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देण्याची भूमिका कशी काय घेऊ शकतो असा सवाल हायकोर्टानं विचारला.
प्रकाश मेहता यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कारवाई न करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. पालिका अभियंत्यांनीही याचा स्पष्ट उल्लेख आपल्या
अहवालात केला होता. दरम्यान 30 जूनपर्यंत इथल्या सर्व बेकायदा झोपडपट्ट्या हटवण्यात येतील अशी ग्वाही पालिकेनं हायकोर्टाला दिली.