प्रेमी युगुलाला निर्वस्त्र करुन गावातून काढली धिंड

वृत्तसंस्था, राजस्थान   राजस्थानमध्ये एका प्रेमी युगुलाला निर्वस्त्र करुन त्यांची गावातून धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांसह चार आरोपींना पोलिसांनी अटक केली.   बांसवाडा जिल्ह्यातल्या या घटनेचा व्हिडियो तिथल्या एका व्यक्तीने शूट केला. प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने शंभूपुरा गावातल्या या तरुण-तरुणीने 22 मार्चला घरातून पळ काढला होता.   घरातून […]

प्रेमी युगुलाला निर्वस्त्र करुन गावातून काढली धिंड

वृत्तसंस्था, राजस्थान

 

राजस्थानमध्ये एका प्रेमी युगुलाला निर्वस्त्र करुन त्यांची गावातून धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांसह चार आरोपींना पोलिसांनी अटक केली.

 

बांसवाडा जिल्ह्यातल्या या घटनेचा व्हिडियो तिथल्या एका व्यक्तीने शूट केला. प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने शंभूपुरा गावातल्या या तरुण-तरुणीने 22 मार्चला घरातून पळ काढला होता.

 

घरातून पळून ते गुजरातला गेले होते. मात्र पीडित मुलीच्या कुटुंबाला याबाबतची माहिती मिळताच त्यांनी गुजरातहून या दोघांना गावात आणलं. त्यानंतर मुलीच्या कुटुंबाने तसंच गावातल्या लोकांनी या दोघांना निर्वस्त्र करुन त्यांची गावातून धिंड काढली तसंच त्यांना मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number