चिखलदरात घरगुती वादातून दाम्पत्याची आत्महत्या

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे दाम्पत्याने घरगुती वादातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिखलदरा येथील भीमकुंड येथे दोन हजार खोल दरीत उडी मारुन या दाम्पत्यांनी जीवन संपवले. या दाम्पत्याला एक मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आत्महत्या करताना मुलगा घरी असल्यामुळे थोडक्यात बचावला. गणेश हेकडे असे पतीचे नाव असून राधा हेकडे असे पत्नीचे नाव […]

चिखलदरात घरगुती वादातून दाम्पत्याची आत्महत्या

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे दाम्पत्याने घरगुती वादातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिखलदरा येथील भीमकुंड येथे दोन हजार खोल दरीत उडी मारुन या दाम्पत्यांनी जीवन संपवले. या दाम्पत्याला एक मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आत्महत्या करताना मुलगा घरी असल्यामुळे थोडक्यात बचावला. गणेश हेकडे असे पतीचे नाव असून राधा हेकडे असे पत्नीचे नाव आहे.

नेमकं काय घडलं ?

चिखलदरा येथील भीमाकुंड येथे गणेश हेकडे आणि त्यांची पत्नी राधा हेकडे यांनी आत्महत्या केली.

घरगुती वादातून ही आत्महत्या केल्याचे समजते आहे.

गणेश हा कुस्तीपटू असून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा विद्यार्थी होता.

दररोज वाद होत असल्यामुळे राधा हेकडे तीन अठवड्यांपासून माहेरी गेली होती.

गणेश हेकडे तिच्या माहेरी जाऊन तिला समजावून भीमकुंड पॉईंटवर घेऊन आला.

त्यानंतर या दोघांनी दोन हजार खोल दरीत उडी मारत आत्महत्या केली.

या दाम्पत्याला एक वर्षाचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यांचा मृतदेह अद्याप सापडला नसून शोझमोहिम सुरू आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number