विधानपरिषद निवडणुकीत विरोधीे पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा चमत्कार पाहायला मिळाला. विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत.
भाजपचे प्रसाद लाड विजयी झाले आहेत.
काँग्रेसचे भाई जगताप यांचा पराभव झाला आहे.
शिवसेनेची ३ मते फुटली असून शिवसेनेला स्वत:ची मते मिळवतानाच मारामार करावी लागत आहे. शिवसेनेला ५६ पैकी ५३ मतं मिळाली आहेत.
राष्ट्रवादीला दोन मतं जास्तीची मिळाली आहेत.
काँग्रेसची तीन मते फुटली असून काँग्रेसला स्वत:ची मते मिळवतानाच मारामार करावी लागत आहे. काँग्रेसला ४४ पैकी ४१ मतं मिळाली आहेत.
भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात विधान परिषदेच्या दहाव्या जागेसाठी चुरशीची लढत आहे.
काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचाही निकाल अद्याप प्रतिक्षेत आहे.
भाजपचे प्रसाद लाड यांचा निकाल अद्यापही प्रतिक्षेत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर विजयी झाले आहेत.
भाजपचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.
भाजपचे प्रवीण दरेकर, उमा खापरे विजयी झाले आहेत.
शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पाडवी विजयी झाले आहेत.
भाजपचे श्रीकांत भारतीय विजयी झाले आहेत.
भाजपचे राम शिंदे विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे विजयी झाले आहेत.
भाजपचे उमेदवार उमा खापरे यांचे मत बाद केल्यामुळे भाजपाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
आक्षेप घेण्यात आलेली दोन्ही मतं बाद करण्यात आलेली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातील एक मत अडचणीत आहे.
भाजपाच्या आक्षेपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांचा १ मत बाजूल ठेवण्यात आला आहे. रामराजे यांचे मत बाद झाल्यामुळे महाविकास आघाडी – भाजपात खडाजंगी उडाली आहे. रामराजे यांच्या कोट्यातील मत बाद बाजूला ठेवल्यामुळे मविआला धक्का बसला आहे.
विधानपरिषदेचे उमेदवार कोण आहेत?