बोंडअळीच्या प्रार्दुभावाने कापसाचं नुकसान

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी जितका कापूस लावला होता, तो सगळा कापूस बोंडअळीने खाऊन टाकलाय. जिल्हा आणि कृषी प्रशासनाने जिल्यातील कापसाच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केल्यानंतर ही धक्कादायक आकडेवारी समोर आली. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदतीसाठी 296 कोटी 25 लाख 8 हजार रुपयाची मागणी सरकारकडे जिल्हा प्रशासनाने केली आहे. यंदा कापसाच्या […]

बोंडअळीच्या प्रार्दुभावाने कापसाचं नुकसान

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी जितका कापूस लावला होता, तो सगळा कापूस बोंडअळीने खाऊन टाकलाय. जिल्हा आणि कृषी प्रशासनाने जिल्यातील कापसाच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केल्यानंतर ही धक्कादायक आकडेवारी समोर आली. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदतीसाठी 296 कोटी 25 लाख 8 हजार रुपयाची मागणी सरकारकडे जिल्हा प्रशासनाने केली आहे.

यंदा कापसाच्या वाढीच्या काळात पाऊस चांगला पडल्याने कापसाचे उत्पन्न वाढेल अशी आशा होती. मात्र, बोंडांची लागण झाल्यानंतर गुलाबी आणि शेंदरी अळीने हल्ला केला. सरकारकडून प्रती हेक्टरी 6 हजार 800 रुपयाची मदत जाहीर केलीय, मात्र ती कधी मिळेल असा प्रश्न निर्माण झालाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number