किडनी प्रत्यारोपणाच्या परवानगीसाठी 1.5 लाखांची लाच!

मुंबईच्या जेजे रूग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किडनी ट्रान्सप्लांटच्या परवानगीसाठी लाच मागणाऱ्या समाजसेवा अधिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलं आहे. या प्रकरणामुळे एक नवं किडनी रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.     दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे जमालुद्दीन खान यांच्यावर रहेजा रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र किडनी प्रत्यारोपणाच्या कायदेशीर परवानगीसाठी जेजे रुग्णालयातील […]

किडनी प्रत्यारोपणाच्या परवानगीसाठी 1.5 लाखांची लाच!

मुंबईच्या जेजे रूग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किडनी ट्रान्सप्लांटच्या परवानगीसाठी लाच मागणाऱ्या समाजसेवा अधिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलं आहे. या प्रकरणामुळे एक नवं किडनी रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे जमालुद्दीन खान यांच्यावर रहेजा रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र किडनी प्रत्यारोपणाच्या कायदेशीर परवानगीसाठी जेजे रुग्णालयातील समाजसेवा अधिक्षकाला दीड लाख रूपये लागणार असल्याचं रहेजा रूग्णालयातील प्रत्यारोपण समन्वयक सचिन साळवे यांनी रूग्णाच्या नातेवाईकांना सांगितलं. पैसे दिल्याशिवाय फाइल क्लियर करणार नाही असं जेजे रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक तुषार सावरकर आणि एस एल रहेजा रुग्णालयाचे ट्रान्सप्लाण्ट समन्वयक सचिन साळवे यांनी सांगितलं.

 

 जमालुद्दिन खान गेल्या तीन वर्षांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त आहेत. चार महिन्यांपूर्वी त्यांची किडनी निकामी झाल्यामुळे त्यांना डायलिसिसवर ठेवण्यात येतंय. अशावेळी त्यांना किडनी प्रत्यारोपणाची आवश्यकता होती. यासाठी कायदेशीर मार्गानेच ते किडनी ट्रान्सप्लाण्ट करत होते. मात्र या कायदेशीर परवानगीची फाइल क्लियर करण्यासाठी दीड लाख इतक्या मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली होती.  

 

तडजोड करून अखेर 80 हजार रूपये देण्याची तयारी रूग्णाच्या नातेवाईकांनी दर्शवली. पण दुसऱ्या बाजूला या सर्व प्रकाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारही केली. त्यानंतर एसीबीने सापळा लावून जेजे रूग्णालयाचे समाजसेवा अधिक्षक तुषार सावरकर आणि एस एल रहेजा रूग्णालयाचे ट्रान्सप्लान्ट समन्वयक सचिन साळवे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं. 

 

मात्र या प्रकरणाचा जे जे रुग्णालयाचा काहीही संबंध नाही या दोघांनी हे परस्पर केलेली गोष्ट आहे याचा तपास वरिष्ठांच्या मार्फत सुरू आहे अशी माहीती जे जे रुग्णालयातून सांगण्यात आली आहे. एकीकडे अवयवदान मोहीम सुरू असताना हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. यामुळे लोकांच्या मनात नकारात्मकता येऊ शकते. तसंच अवयदानाबद्दल जनजागृती सातत्याने करत असल्याने लोकांची मानसिकता बदलत आहे. मात्र या प्रकरणामुळे लोकांच्या मनात संशय निर्माण होईल असं मत जेष्ठ पत्रकार तसंच अवयवदान करण्यासाठी जनजागृती करणारे संतोष आंधळे यांनी केलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number