आज सायंकाळी ४ वाजता राज्यमंत्रीमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. आजच्या बैठकीत महत्वाचं म्हणजे कोरोना रूग्णसंख्या वाढीबाबत चर्चा झाली आहे. कोरोना विषयी चिंता व्यक्त केली गेली आहे. राजेश टोपे यांनी वाढत्या कोरोनाबाबत मविआला चिंता असल्याचं सांगितलं आहे. देशात कोरोनाचा फैलाव वाढतोय त्यामुळे कोरोना चाचण्या वाढवणार असल्याचं राजेश टोपो यांनी सांगितलं आहे. बैठकीत दिंडी बाबत देखील चर्चा झाली आहे. दिंडीत १० ते १५ लाख लोक सहभागी होतात. त्यामुळे काळजी घेऊन दिंडी पूर्ण करावी अशी प्राथमिक चर्चा या बैठकीत पार पडली आहे. वारी होईल. त्यात, कोणत्याही प्रकारची बंधण नसणार आहे. मास्क सक्ती नाही परंतू मास्क लावण्याचा आवाहान करण्यात आलं आहे.
बैठकीनंतर दादा भुसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, राज्याच्या पीक पेरणीबाबतही चर्चा झाली आहे. वेध शाळेने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस तिन-चार दिवस लांबतो आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहता राज्यातील शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे. जोपर्यंत ८० मीमी ते १०० मीमी पाऊस पडत नाही. तो पर्यंत पेरणी करू नये. अशी विनंती राज्यमंत्रीमंडळाकडून करण्यात आली आहे.