अख्या जगाला हादरून सोडलेल्या कोरोना व्हायरस ने भारतातही आगमन केलं आहे. आत्तापर्यंत 29 च्या जवळपास कोरोनाचे रुग्ण भारतात आढळल्याने संपूर्ण भारताला रेड अलर्ट करण्यात आले आहे. याचा फटका बुलढाण्यातील सैलानी बाबाच्या यात्रेला बसला आहे.
बुलडाण्याजवळून 25 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या सैलानी बाबाची यात्रा यंदाच्या वर्षी रद्द करण्यात आली आहे.
या वर्षी या यात्रेला कोरोना व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. कारण सैलानी बाबाच्या यात्रा महोत्सवात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात.
विशेष म्हणजे पर राज्यातून या यात्रेमध्ये भाविक येत असतात. तर यात्रेत अस्वच्छतेचे वातावरण, उघड्यावर मास विक्री यासारख्या अनेक गोष्टींमुळे कोरोनाचा धोका यात्रेत नाकारता येत नाही.
प्रत्येक वर्षी बुलडाण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांचा जगप्रसिद्ध दर्गा आहे. प्रत्येक वर्षी होळीच्या दिवशी होळी जाळून यात्रेची सुरुवात होत असते.
सदर यात्रा 15 दिवस चालत असते. होळीच्या 5 दिवसांनी सैलानी बाबाना संदल चढविले जाते. या यात्रेत प्रत्येक वर्षी 5 ते 6 लाख भाविक सैलानी बाबांच्या दर्शनासाठी येतात. यावर्षीही सोमवारी 9 मार्च पासून होळी जाळून यात्रेला सुरुवात होणार होती.
मात्र या वर्षीच्या यात्रेवर कोरोना व्हायरसचा धोका असल्याचे चिन्ह आहे. कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य व्हायरस असून याची लागण दुसऱ्याला ताबडतोब होते.
म्हणूनच लाखोंच्या संख्येने भरल्या जाणाऱ्या यात्रेला यावर्षी कोरोना व्हायरसमुळे थांबवण्याची गरज निर्माण झाली आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने देखील लक्ष देत ही यात्रा रद्द केली आहे.