Corona Cases : कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, 4 रुग्णांचा मृत्यू; 12 जण बाधित

कोरोना वायरस संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. 1 जुलैपासून आतापर्यंत संपूर्ण भारतात कोरोनाच्या 339 केसेस नोंदवल्या गेल्या आहेत.

Corona Cases : कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, 4 रुग्णांचा मृत्यू; 12 जण बाधित

कोरोना वायरस संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. 1 जुलैपासून आतापर्यंत संपूर्ण भारतात कोरोनाच्या 339 केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. यावेळी आंध्र प्रदेशात गेल्या 20 दिवसांत कोरोना व्हायरसचे काही नवीन रुग्ण आढळले आहेत. 26 जून ते 16 जुलै दरम्यान आंध्र प्रदेशात कोविड-19 संसर्गाने 12 जणांना लागण झाली असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. 26 जून ते 15 जुलै दरम्यान राज्यभरात 67 कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये 11 जण पॉझिटिव्ह आढळले होते.

तर 1 जुलै ते 16 जुलै दरम्यान आणखी 11 प्रकरणं समोर आली. यावेळी सर्वात जास्त आठ संसर्ग कडप्पा येथेच नोंदवल गेल्याचे समोर आले आहे. तसेच दोन रुग्ण गुंटूर, एक रुग्ण विशाखापट्टणम आणि काकीनाडा जिल्ह्यात आढळली आहे. या घटनेनंतर आरोग्य विभाग सतर्क झाले असून राज्य सरकारने पाच नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेत पाठवले आहेत ज्यामुळे विषाणूचे प्रकार ओळखण्यास मदत होईल.

हेही वाचा- PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! पीएम किसानचा 24 वा हप्ता 'या' तारखेला होणार जमा; जाणून घ्या कोण ठरणार अपात्र?

पण प्रशासनाने स्पष्ट केले आहे की राज्यातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून सामान्य जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही. तसेच ज्या रुग्णांचा मृत्यू कोव्हिडमुळे झाला आहे, त्यांना आधीपासूनच अन्य काही जुने आजार होते. सध्या इतर रुग्णांना स्पेशल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. आंध्र प्रदेशातील गंभीरता लक्षात घेता कर्नाटक राज्यात खबरदारी वाढवण्यात आली आहे. तसेच केरळमध्ये देखील कोरोनाचे 115 रुग्ण समोर आले आहे.

याशिवाय कर्नाटकात 64, महाराष्ट्रात 43, तमिळनाडूमध्ये 39, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहात 18, दिल्लीत 18 आणि राजस्थानमध्ये 18 केसेस समोर आल्या आहेत. आतापर्यंत कोरोना विषाणूचे हजारो प्रकार समोर आले आहेत. यापैकी, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) काही प्रमुख प्रकारांचे "अल्फा," "बीटा," "गामा," "डेल्टा," आणि "ओमिक्रॉन" असे वर्गीकरण केले आहे. ओमिक्रॉनचे अनेक उप-प्रकार, जसे की JN.1, XFG, आणि NB.1.8.1, हे देखील वेळोवेळी समोर आले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number