दर नसल्यानं कोथिंबिर वाटली फुकटात

एकीकडे कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. दुसरीकडे एकही भाजीपाल्याला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशातच नाशिकमध्ये शेतकऱ्याला कोथिंबीर फुकट वाटण्याची वेळ आली आहे. सरकारला जाग तरी केव्हा येणार असा सवाल या शेतकऱ्याने केला आहे. लोक गाड्या थांबून कोथिंबीर घेत आहेत. फुकट वाटत असल्याने कोथंबीर घेण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली दिसून येत आहे. […]

दर नसल्यानं कोथिंबिर वाटली फुकटात

एकीकडे कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. दुसरीकडे एकही भाजीपाल्याला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशातच नाशिकमध्ये शेतकऱ्याला कोथिंबीर फुकट वाटण्याची वेळ आली आहे. सरकारला जाग तरी केव्हा येणार असा सवाल या शेतकऱ्याने केला आहे.

लोक गाड्या थांबून कोथिंबीर घेत आहेत. फुकट वाटत असल्याने कोथंबीर घेण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली दिसून येत आहे. भाजीफुकट द्यायची वेळ आलेली आहे. शेतकरी जर जगला तर सगळे लोक जगतील. मध्यमवर्गीय असतील, मोठे लोक असतील, गोरगरीब असतील सगळे शेतीमालावर अवलंबून आहे. मात्र जर कचऱ्यापेक्षा वाईट परिस्थिती जर शेती मालाची आहे. त्यामुळे आज रस्त्यावर आम्हाला यायची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना तिथे बाजार समिती रेट देत नाही. एक रुपया दोन रुपये भाव भेटला आहे. आम्ही ४० किलोमीटरवरून येऊन भाजीला भाव मिळत नसेल तर शेतकऱ्याने मरायचे का? असा आर्त सवाल या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे.

दिंडोरी तालुक्यातील जोपुळ येथील हे शेतकरी होते या शेतकऱ्याने आज शेतातील कोथंबीर काढून व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी आणलेली होती. मात्र योग्य भाव न मिळाल्याने बाजार समितीच्या बाहेरच रस्त्यावर फुकट वाटण्यास सुरुवात केली. शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार लागवडीचा खर्च मजूर खर्च गाडी भाड्याचा खर्च हे सगळे पकडून आज कोथिंबीरीला एक रुपया जुडीचा भाव मिळाला. यावेळी रस्त्यावर रस्त्यावर उभे राहून या शेतकऱ्याने कोथिंबीरीच्या जुड्या फुकट वाटण्यास सुरुवात केली. यावेळेस यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी गाड्या थांबवत कोथिंबिरीच्या जुड्या घेण्यास सुरुवात केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number