कांदिवलीतील शाळेत अजान लावल्यानं वाद

शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ हे सुरू झाले आहेत. मात्र सुरू होऊन अजून आठवडा पूर्ण नाही तर शाळेमध्ये काय शिकवल जात आहे असा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. कांदिवली पश्चिम महावीर नगर येथील कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलांना अजान शिकवल्याची धक्कादायक घटना समोर आली असून शुक्रवारी सकाळी शिवसेनेचे कार्यकर्ते शाळेत पोहोचल्यानंतर गोंधळ पाहायला मिळाला. त्यानंतर स्थानिक शिवसेना […]

कांदिवलीतील शाळेत अजान लावल्यानं वाद

शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ हे सुरू झाले आहेत. मात्र सुरू होऊन अजून आठवडा पूर्ण नाही तर शाळेमध्ये काय शिकवल जात आहे असा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. कांदिवली पश्चिम महावीर नगर येथील कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलांना अजान शिकवल्याची धक्कादायक घटना समोर आली असून शुक्रवारी सकाळी शिवसेनेचे कार्यकर्ते शाळेत पोहोचल्यानंतर गोंधळ पाहायला मिळाला. त्यानंतर स्थानिक शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जाऊन या संपूर्ण घटनेचा जाब विचारला. शाळेने यासंदर्भात माफी मागितली असून हा संपूर्ण विषय पुढे न वाढवण्याची मागणी केली आहे. मात्र शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी एफआईआर ची मागणी केली असून कांदिवली पोलिसांनी या संपूर्ण घटनेचे चौकशी करू एफआईआर नोंदवून कारवाई करण्याच्या आश्वासन दिले आहे.

गेल्या काही दिवासांपासून राज्यात जाती धर्मावरुन वाद सुरु आहे. अशातच मुंबई येथील कपोल विद्यानिधी शाळा धार्मिक वादाच्या भोवऱ्यात अडकली आहेत. शिवसेनेकडून शाळेवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या शाळेवर मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली. या संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून त्यावर कारवाई करण्याची मागणी देखील शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number