नवी मुंबईतील वाशी मधील सेंट लॉरेंस शाळेमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय. दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी जय श्री राम अशा घोषणा दिल्याने त्यांना शाळेतून तात्पुरते निलंबित करण्यात आलेय. दहा ते बारा विद्यार्थ्यांनी जय श्री राम च्या घोषणा दिल्या होत्या त्यापैकी सहा विद्यार्थ्यांचे निलंबन करण्यात आलेय. नगर शाळा प्रशासनाने काहीही बोलण्यास नकार दिला असून विद्यार्थ्यांचे पालकही समोर येण्यास नकार देत आहेत. या संदर्भात पालक संघटनेचे पदाधिकारी विजय साळे यांनी विद्यार्थ्यांना शाळेत न घेतल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.