औरंग्याचा फोटो स्टेटसला ठेवल्याने पुन्हा वाद

सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या फोटो वरून अहमदनगर, संभाजी नगर, कोल्हापूर या ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण झाला होता. आता नवी मुंबईत देखील औरंग्याचा फोटो स्टेटसला ठेवल्याने पुन्हा वाद निर्माण झाला आहे. शिवराज्याभिषेक दिनी मुस्लीम तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं वादाची ठिणगी पडलीय. तर दोन दिवसांपूर्वी, अहमदनगरमध्ये उरुसनिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणूकीत काही तरुणांनी औरंगजेबाचा फोटो झळकावला होता. सर्वत्र ३५० […]

औरंग्याचा फोटो स्टेटसला ठेवल्याने पुन्हा वाद

सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या फोटो वरून अहमदनगर, संभाजी नगर, कोल्हापूर या ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण झाला होता. आता नवी मुंबईत देखील औरंग्याचा फोटो स्टेटसला ठेवल्याने पुन्हा वाद निर्माण झाला आहे.

शिवराज्याभिषेक दिनी मुस्लीम तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं वादाची ठिणगी पडलीय. तर दोन दिवसांपूर्वी, अहमदनगरमध्ये उरुसनिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणूकीत काही तरुणांनी औरंगजेबाचा फोटो झळकावला होता. सर्वत्र ३५० व्या शिवराज्याभिषेकाचा सोहळा अतिशय उत्साहात पार पडत असताना एकीकडे औरंग्याचे स्टेट्स टाकण्याचा प्रकार घडला. यावरून चांगलाच वाद चिघळला आहे. तर दुसरीकडे औरंगजेबाचा पुतळा जाळल्याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या फोटो वरून अहमदनगर, संभाजी नगर, कोल्हापूर या ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण झाला होता. आता नवी मुंबईत देखील मोहम्मद हनिफ या तरुणाने त्याच्या व्हाट्सअप स्टेटसला औरंगजेबाचा फोटो ठेवल्याने वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनानी आवाज उठवल्यावर मोहम्मद अली मोहम्मद हुसेन या २९ वर्षीय तरुणावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number