भाजपा आमदार राम कदम यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, या व्हिडीओत राम कदम यांनी मतदार यादीत नाव नोंदवण्याचं आवाहन केलं आहे.
महागड्या आणि आलिशान गाड्यांमध्ये फिरायचं असेल, तिरूपतीला दर्शनासाठी जायचं असेल किंवा मग हिंदी चित्रपटसृष्टीच्या कलाकारांसह फोटो काढायचे असल्यास मतदार यादीत नाव नोंदवा, असं आवाहन कदम यांनी ट्विटरवरच्या या व्हिडीओद्वारे केलं आहे.
सक्षम #मतदार, सक्षम लोकशाही,
जबाबदारी तुमची, जबाबदारी आमची,
नवमतदारांनो, #लोकशाहीला सक्षम बावनवण्यासाठी आजच आपले नाव मतदार यादीत नोंदवा आणि आमच्यासोबत तिरुपती #बालाजी यात्रेला चला.#ElectionCommission #PMOIndia pic.twitter.com/ADI6XGCdaw — Ram Kadam (@ramkadam) October 13, 2018
याशिवाय मतदार यादीत नाव नोंदवल्यास सिनेमाचं चित्रीकरण पाहणं आणि कार चालवणं शिकवण्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी या व्हिडीओद्वारे दिली आहे.
तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी हे करत असल्याचे कदम यांनी या व्हिडीओत म्हटंल आहे, मात्र या व्हिडिओमुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे.
Your '#Vote' is your voice to make a better nation. Hence, register your name in the voter list & be a part of the divine tour to 'Balaji' temple with me. #VoteIsYourRight pic.twitter.com/l1sgzfgsxs — Ram Kadam (@ramkadam) October 13, 2018