जळगावात दूषित पाणी

जळगाव शहरात अनेक भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक विकारांना समोर जावं लागत आहे. त्यामुळे नागरिकात मोठा रोष असल्याचं पाहायला मिळत आहे. तक्रारी करून देखील शुद्ध पाणी पुरवठा होत नसल्याने शहरातील संतप्त नागरिकांनी मनपावर मोर्चा आणला, यावेळी नागरीकांनी अशुध्द पाण्याच्या पुरवठा बाबत पाणी पुरवठा अधिकाऱ्याला जाब […]

जळगावात दूषित पाणी

जळगाव शहरात अनेक भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक विकारांना समोर जावं लागत आहे. त्यामुळे नागरिकात मोठा रोष असल्याचं पाहायला मिळत आहे. तक्रारी करून देखील शुद्ध पाणी पुरवठा होत नसल्याने शहरातील संतप्त नागरिकांनी मनपावर मोर्चा आणला, यावेळी नागरीकांनी अशुध्द पाण्याच्या पुरवठा बाबत पाणी पुरवठा अधिकाऱ्याला जाब विचारला आणि सोबत आणलेले गढूळ पाणी पिण्यासाठी योग्य आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.

सध्या वाढत्या तापमानाचे कारण देत त्यामुळे पाणी पिवळसर येत असल्याचा दावा करीत, पाणी पुरवठा अधिकारी गोपाळ लूले यांनी चक्क नागरिकांनी आणलेले दूषित पाणी पिऊन दाखवत, शहरात होत असलेलं दूषित पाणी हे पिण्यास योग्य असल्याचं एक प्रकारे दाखवायचा प्रयत्न केला आहे. अधिकाऱ्याने दूषित पाणीच पिऊन दाखविल्याने मोर्चा मध्ये आलेल्या नागरिकांना मात्र हसावं का रडाव अस झाल्याचं या वेळी पाहायला मिळाले आहे.

जळगावातील दुषित पाण्याने तेथील नागरिक आजारी पडत आहेत. परंतू, तेथील अधिकारी नागरिकांना हे पाणी पिण्या योग्य असल्याचा दावा करत आहेत. परंतू, जर हे दुषित पाणी असचं सुरू राहिले तर याचा परिणाम नागरिकांच्या तब्येतीवर होउ शकतो या गोष्टीवर आता तरी सरकार काही ठोस पाऊलं उचलणार का हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number