कर्नाटकात काँग्रेसचा दणदणीत विजय!

कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला होता. या निवडणुकांचा अखेरीस निकाल लागला असून काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. तर, भाजपाचा पराभव झाला आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. मतमोजणीतील आघाडीनुसार, एकूण २२४ जागांपैकी काँग्रेस १३६ जागा तर, भाजपला ६४ जागांवर विजय मिळाला आहे. एक्झिट पोलमध्ये किंगमेकर राहण्याची शक्यता वर्तवलेला जनता दल […]

कर्नाटकात काँग्रेसचा दणदणीत विजय!

कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला होता. या निवडणुकांचा अखेरीस निकाल लागला असून काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. तर, भाजपाचा पराभव झाला आहे.

कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. मतमोजणीतील आघाडीनुसार, एकूण २२४ जागांपैकी काँग्रेस १३६ जागा तर, भाजपला ६४ जागांवर विजय मिळाला आहे. एक्झिट पोलमध्ये किंगमेकर राहण्याची शक्यता वर्तवलेला जनता दल सेक्युलरने २० जागांवर विजय मिळवला आहे. तर, इतर ४, राष्ट्रवादीला ३ आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला ० असा एकूण निकाल लागला आहे. निवडणुकीतील या विजयानंतर देशभरात काँग्रेसने जल्लोष साजरा केला.

या निवडणुकीत अवघ्या काही मतांमुळे भाजपाची सत्ता गेली. भाजपाला शून्य पूर्णांक ४ टक्के मतांची कमतरता होती. राष्ट्रवादीचे एकूण नऊ उमेदवार मैदानात होते. त्यापैकी सहा उमेदवारांना काँग्रेसने हरवले असून जेडीएसकडून दोन तर भाजपाकडून राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांचा पराभव झाला आहे. जनता दल सेक्युलरची वाताहत. जेडीएसची पाच टक्के मते काँग्रेसकडे सरकली.

जनता दल (धर्मनिरपेक्ष)च्या पराभवाची कारणे काय?

  • पाच टक्के मते काँग्रेस कडे गेली.
  • काँग्रेसला ५६ जागांचा फायदा.
  • जेडीएसला १८ जागांचे नुकसान.
  • दलित मतदार दूर गेला.
  • लिंगायत भाजपासोबत राहिले.

भाजपाच्या पराभवाची कारणे काय?

  • अर्धा टक्का मते कमी मिळाली.
  • जनता दल (धर्मनिरपेक्ष)ची पाच टक्के मते काँग्रेसकडे सरकली.
  • कर्नाटक भाजपाच्या जुन्या फळीला दूर ठेवल्याचा फटका
  • सत्तेत असताना कर्नाटक भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप
  • वारसाची सोय लावण्याच्या प्रयत्नात संघटनेकडे दुर्लक्ष

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number