तांबेंचा काँग्रेसला चकवा

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतली आहे आणि त्याजागी त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. तीनवेळा नाशिक विधान परिषद निवडणूक जिंकलेले सुधीर तांबे यांनी माघार घेत यावेळी नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्या मुलाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसकडून सुधीर तांबे यांची उमेदवारी पक्की झालेली असताना, […]

तांबेंचा काँग्रेसला चकवा

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतली आहे आणि त्याजागी त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे.

तीनवेळा नाशिक विधान परिषद निवडणूक जिंकलेले सुधीर तांबे यांनी माघार घेत यावेळी नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्या मुलाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसकडून सुधीर तांबे यांची उमेदवारी पक्की झालेली असताना, ऐनवेळी सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला.

‘युवा नेतृत्वाला संधी द्यावी असे कार्यकर्ते, पक्षश्रेष्ठी तसेच विविध पक्षातील नेते यांचे मत होते, त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना संधी दिली, असे स्पष्टीकरण सत्यजित तांबे यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना सांगितले. ‘अपक्ष अर्ज भरला असला तरी ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, असेही जय महाराष्ट्रशी बोलताना सत्यजित तांबे म्हटले. तसेच, एकच उमेदवारी असल्यामुळे राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेटून, सर्व राजकीय नेत्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन ते करणार आहेत, असेही त्यांनी जय महाराष्ट्राशी बोलताना सांगितले. तर ‘काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला विरोध नाही’, अशी प्रतिक्रिया सुधीर तांबे यांनी दिली आहे.

सुधीर तांबे यांनी काँग्रेसला दिलेल्या या चकव्यावर, काँग्रेस नेते नाना पाटोळे यांनी ‘पक्षपातळीवर चर्चा करून स्पष्टीकरण देण्यात येईल.’, असे म्हटले आहे.
सत्यजित तांबे हे भाजपाच्या गळाला लागले आहेत अशा प्रकारची चर्चा सुरु असताना सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारिचा अर्ज भरून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number