महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने सुरु असलेल्या घडामोडींनी आता चांगलाच वेग धरला आहे. राज्यातील सत्तासंघर्षांनंतर कर्नाटक विधानसभा निवडणूक हा सर्वात चर्चेचा विषय होता. या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. ‘मुसलमानांनी जिंकवले आहे, आमचा उपमुख्यमंत्री करा’ अशी मागणी कर्नाटकात जोर धरत आहे.
कर्नाटक निवडणुकीचा निकाल लागला असून कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र, आता मुख्यमंत्रीपदी कोण बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्नाटकातील राजकीय हालचालींना वेग आला असून प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांना तातडीनं दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. सुरुवातीला फक्त डी. के. शिवकुमार आणि सिद्धारमय्या यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होत. मात्र, आता काँग्रेसचे जेष्ठ नेते जी. परमेश्वर यांचं नावदेखील पुढे येत आहे. ‘काँग्रेसने मुसलमानांची परतफेड करावी’ असा फतवा कर्नाटक सुन्नी उलेमा बोर्डकडून केला जात आहे. ‘मुसलमानांनी जिंकवले आहे, आमचा उपमुख्यमंत्री करा’ अशी मागणी कर्नाटकात जोर धरत आहे. त्यामुळे आता कर्नाटकाच्या निकालानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची धुरा नेमकी कोणाकडे जातेय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.