लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर घणाघाती टीका केली होती. मोदींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी सोमवारी आयोजित केलेल्या झारखंड येथील सभेत कॉंग्रेसमध्ये जर हिम्मत असेल तर राजीव गांधी यांच्या मान-सन्मानाच्या मुद्यावरून लोकसभा निवडणुकीचे पुढचे दोन टप्पे लढावे असे आव्हान दिले आहे.
झारखंड येथील चायबासा येथे आयोजित केलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान मोदींना राजीव गांधींवर केलेल्या वक्तव्यावरून प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले आहे.
त्यामुळे या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसला आव्हान दिले आहे.
जर कॉंग्रेसमध्ये हिम्मत असेल तर राजीव गांधी यांच्या मान-सन्मानाच्या मुद्द्यावरून लोकसभा निवडणुकीचे पुढचे दोन टप्पे लढावे असे आव्हान कॉंग्रेसला देण्यात आले आहे.
राजीव गांधींच्या प्रतिष्ठेच्या मुद्द्यावर रणसंग्राम होऊनच जाऊ दे असे त्यांनी म्हटलं आहे.
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींनी राजीव गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
तुमचे कर्म तुमची वाट पाहत आहे असे ट्विटरच्या माध्यामातून प्रत्युत्तर दिले आहे.
संबंधित बातम्या – https://www.jaimaharashtranews.com/narendra-modis-wrong-comments-on-rajiv-gadhi/