केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. विविध ठिकाणी हिंसक आंदोलन होत असल्याचे चित्र दिसत आहे. अग्निपथ योजनेविरोधातील हे लोण जवळपास १३ राज्यात पसरलं आहे. बिहारसह, मध्य प्रदेश, तेलंगणा या राज्यात आंदोलक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, या आंदोलनात आता काँग्रेसनं उडी घेतली आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात काँग्रेस आज दिल्लीतील जंतरमंतरवर सत्याग्रह आंदोलनसशस्त्र दलात भरतीसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांची एकजूट दाखवण्यासाठी काँग्रेस खासदार आणि नेते जंतर मंतरवर ‘सत्याग्रह’ करणार आहेत.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे उत्सव साजरे न करण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जमराम रमेश यांनी खासदार राहुल गांधी यांच्या वतीने काँग्रेस कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्या नावाने जारी केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, ‘राहुल गांधी यांनी देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या हितचिंतकांना आवाहन केले आहे की. माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही उत्सव करू नये. देशभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपण सर्वच चिंतेत आहोत. करोडो तरुणांचे मन दु:खी आहे. या तरुणांच्या, त्यांच्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी होऊया, त्यांच्या पाठीशी उभे राहूया. असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.
याअगोदर शनिवारी राहुल गांधींनी ट्विट केले होते की, ‘सलग ८ वर्षांपासून भाजप सरकारने ‘जय जवान, जय किसान’च्या मूल्यांचा अपमान केला आहे. पंतप्रधानांना काळा शेती कायदा मागे घ्यावा लागेल, असे मी यापूर्वीही म्हटले होते. त्याचप्रमाणे मोदींना ‘माफिवीर’ बनून देशातील तरुणांची आज्ञा पाळावी लागेल आणि ‘अग्निपथ’ योजना मागे घ्यावी लागेल.’ असे राहुल म्हणाले होते.
8 सालों से लगातार भाजपा सरकार ने ‘जय जवान, जय किसान' के मूल्यों का अपमान किया है। मैंने पहले भी कहा था कि प्रधानमंत्री जी को काले कृषि कानून वापस लेने पड़ेंगे। ठीक उसी तरह उन्हें ‘माफ़ीवीर' बनकर देश के युवाओं की बात माननी पड़ेगी और 'अग्निपथ' को वापस लेना ही पड़ेगा। — Rahul Gandhi (@RahulGandhi) June 18, 2022