जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच विरोधी पक्षांमधील मतभेद उघड झाले आहेत.
विरोधी पक्षांच्या बैठकीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं बहिष्कार घातला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक होती.
मात्र, अभिनंदन प्रस्तावाबाबत काँग्रेसच्या मागणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस नाराज झाली. संसदीय कामकाजाला 50 वर्षं पूर्ण झालेल्यांचा अभिनंदन प्रस्ताव अधिवेशनात
मांडला जाणार आहे.
यात शरद पवार आणि इंदिरा गांधींचा समावेश आहे. तर, भाजपकडून दीनदयाळ उपाध्यय, बाळासाहेब देसाई आणि नानासाहेब देशमुख यांचा समावेश आहे.
यावेळी काँग्रेसने राजशिष्टाचारानुसार अभिनंदन प्रस्ताव मांडला जावा अशी मागणी केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तसं पत्र अध्यक्ष
आणि सभापतींना 13 जुलैला दिले.
काँग्रेसच्या या मागणीनुसार अभिनंदन प्रस्ताव मांडल्यास शरद पवार यांचं नाव मागे पडेल. अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. त्यामुळे नाराज राष्ट्रवादीने संयुक्त
बैठकीला जाणं टाळले.