सरकारविरोधात काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून उत्तर महाराष्ट्रात सुरू होत आहे,
या यात्रेची सुरुवात जळगावमधून होणार आहे, काँग्रेसच्या 3 माजी मुख्यमंत्र्यांसह पक्षातील अनेक दिग्गज नेते या यात्रेत सहभागी होणार आहेत.
या यात्रेला धनाजी नाना महाविद्यालयापासून सुरुवात होणार आहे, सुरुवातीला स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यासाठी प्रेरणा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे.
त्यानंतर महात्मा गांधी आणि धनाजी नाना यांना अभिवादन करून भजन केले जाणार आहे.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील आणि पक्षाचे पदाधिकारी आणि आमदार उपस्थितीत राहणार आहेत.
देशातील वाढती महागाई ,पेट्रोल डिझेलचे वाढते भाव ,शेतकऱ्यांवरील अन्याय अत्याचार, राफेल विमान घोटाळा इत्यादी मुद्यांवर आंदोलन केले जाणार आहे