वृत्तसंस्था, गुजरात
गुजरात निवडणुकीत काँग्रेस आणि हार्दिक पटेल एकत्र तर आले आहेत. मात्र, टिकीट वाटपा वरुन काँग्रेस आणि पाटीदार आंदोलन संघटनेतील कार्यकर्ते आपापसांत भिडले आहेत. काँग्रेस आणि हार्दिक पटेल गुजरात निवडणुकीत भाजपा विरोधात एकत्र आले असले तरी या दोन्ही पक्षातील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाल्यावर हा वाद उफाळुन आला आहे.
सुरतमध्ये पाटीदार आंदोलन संघटनेचे कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात तिकीट वाटपाच्या मुद्दया वरुन जोरदार हाणामारी झाली.