केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या घराबाहेर काँग्रेसचे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुळे कोरोना वाढला असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे पंतप्रधानांच्या वक्तव्याच्या निषेध नोंदविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सिंधुदुर्गातील काँग्रेस आक्रमक झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील घराबाहेर काँग्रेसने आंदोलन केले आहे. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलीसांनी धरपकड केली. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आंदोलन केले. काँग्रेसने देशात […]

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या घराबाहेर काँग्रेसचे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुळे कोरोना वाढला असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे पंतप्रधानांच्या वक्तव्याच्या निषेध नोंदविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सिंधुदुर्गातील काँग्रेस आक्रमक झाली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील घराबाहेर काँग्रेसने आंदोलन केले आहे. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलीसांनी धरपकड केली. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आंदोलन केले. काँग्रेसने देशात कोरोना पसरवला अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रसने जोरदार घोषणाबाजी केली.

नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर समर्थक एकवटले

काँग्रेसच्या आंदोलनापूर्वीच मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर समर्थक एकवटले होते. यावेळी राणेंच्या बंगल्याबाहेर समर्थकांनी काँग्रेस आणि नाना पटोले यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच काँग्रेसला सुद्बुद्धी देरे महाराजा, असे म्हणत समर्थकांनी रामेश्वरला साकडं घातले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number