एसटी संपामुळे शिक्षक पात्रता परीक्षार्थींचे हाल

    एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिन करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मात्र राज्यात सुरू असलेल्या एसटी संपाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. दरम्यान रविवारी एसटी बससेवा बंद असल्यामुळे परीक्षार्थींचे हाल झाले आहेत.   एसटी बससेवा बंद असल्यामुळे शिक्षक पात्रता परिक्षेचे उमेदवार परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचले. त्यामुळे त्या उमेदवारांचा प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे एसटी […]

एसटी संपामुळे शिक्षक पात्रता परीक्षार्थींचे हाल

    एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिन करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मात्र राज्यात सुरू असलेल्या एसटी संपाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. दरम्यान रविवारी एसटी बससेवा बंद असल्यामुळे परीक्षार्थींचे हाल झाले आहेत.

  एसटी बससेवा बंद असल्यामुळे शिक्षक पात्रता परिक्षेचे उमेदवार परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचले. त्यामुळे त्या उमेदवारांचा प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे एसटी संपाचा जबर फटका शिक्षक पात्रता परिक्षेच्या उमेदवारांना बसला असून शिक्षक पात्रता परीक्षेचा गोंधळ उडाला आहे.

    महाराष्ट्र राज्य परिक्षेतर्फे आज शिक्षक पात्रता परिक्षेचे ४३ केंद्रांवर आयोजन करण्यात आले होते. उमेदवारांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी वीस मिनीट अगोदर परिक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक होते. मात्र राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकाराला असल्यामुळे विद्यार्थी वेळेवर परिक्षा केंद्रांवर पोहचले नाहीत. त्यामुळे कोल्हापूर, परभणीमध्ये परीक्षार्थींचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत.

   राज्यभरात एसटीचा संप सुरू आहेत. एसटी बससेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही परीक्षा केंद्रावर पोहचणार कसे, एसटी संपामध्ये आमचे नुकसान करू नका, अशी विनवणी उमेदवारांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number