ओमायक्रॉननंतर आता आयएचयू व्हेरिएंटची चिंता

संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला. त्यातच कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन विषाणूने डोकं वर काढले आहे. दरम्यान आता ओमायक्रॉन डेल्टानंतर आयएचयू या नव्या व्हेरिएंटने जगभरात चिंता वाढवली आहे. आयएचयू व्हेरिएंटने ४६ वेळा रुप बदलले आहे. फ्रान्समध्ये आयएचयू विषाणूचे १२ रुग्ण सापडले असून हे रुग्ण कॅमेरून देशातून परतले आहेत. मात्र आयएचयू विषाणूचा प्रसार वेगाने पसरत नसल्याचे समोर […]

ओमायक्रॉननंतर आता आयएचयू व्हेरिएंटची चिंता

संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला. त्यातच कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन विषाणूने डोकं वर काढले आहे. दरम्यान आता ओमायक्रॉन डेल्टानंतर आयएचयू या नव्या व्हेरिएंटने जगभरात चिंता वाढवली आहे. आयएचयू व्हेरिएंटने ४६ वेळा रुप बदलले आहे. फ्रान्समध्ये आयएचयू विषाणूचे १२ रुग्ण सापडले असून हे रुग्ण कॅमेरून देशातून परतले आहेत. मात्र आयएचयू विषाणूचा प्रसार वेगाने पसरत नसल्याचे समोर आले आहे.

फ्रान्समध्ये आयएचयू व्हेरिएंटचे रुग्ण सापडले असून हा व्हेरिएंट इतर देशांमध्ये पसरला आहे का? याचा शोध जागतिक आरोग्य संघटना करत आहे. आयएचयू व्हेरिएंट अधिक ताकदीचा असू शकतो त्यामुळे या व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी लसीकरणाचा परिणाम कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान दरम्यान भारतासह फ्रान्स आणि इतर देशांमध्ये कोरोना, ओमायक्रॉन विषाणूने दहशत माजवली आहे. फ्रान्समध्ये कोरोना झालेल्या रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनबाधित आहेत. त्यामुळे फ्रान्सच्या आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली असून दरम्यान एचआययू विषाणूचे नवे रुग्ण सापडल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number