अवकाळी पाऊस व गारपिटीने अमरावती जिल्ह्यात ३ हजार हेक्टरवर संत्रा,गहू, हरभराचे नुकसान झाले. त्यामुळे शेती बांधावर जाऊन अमरावती मधील वडगांव माहोरे येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय आणि जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केली.यावेळी विभागीय आयुक्तआणि जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्या सोबत चर्चा करून नुकसानीची माहिती घेतली.
यावेळी जिल्हा प्रशासनामार्फत नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करुन पंचनामा करण्याची कार्यवाही सुरु आहे अशी माहिती विभागिय आयुक्तांनी दिली.अमरावती तालुक्यात काल ७०० हेक्टर शेतीचं नुकसान झालं असं एकूण ६ सहा तालुक्यात ३ हजार हेक्टर शेती पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे शेतीचे पंचनामे व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करा. नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहू नये. असे आदेश डॉ. निधी पाण्डेय यांनी दिले आहेत.