बेपत्ता झाल्याच्या बातमीनंतर, कॉमेडियन सिद्धार्थ सागरचा व्हिडीओ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई कलर्स टिव्हीवरील ‘कॉमेडी क्लासेस’मध्ये सेल्फी मौसीची भूमिका निभावणारा कॉमेडिअन सिद्धार्थ सागर चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली. अचानक बेपत्ता झाल्याने त्याचा मित्रपरिवार, सहकलाकार आणि त्याचे चाहते हैराण होते. गायब झाल्याची बातमी सगळीकडे पसरल्यानंतर, सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. “मी काही काळापासून अनेक अडचणींचा सामना करत होतो. […]

बेपत्ता झाल्याच्या बातमीनंतर, कॉमेडियन सिद्धार्थ सागरचा व्हिडीओ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कलर्स टिव्हीवरील ‘कॉमेडी क्लासेस’मध्ये सेल्फी मौसीची भूमिका निभावणारा कॉमेडिअन सिद्धार्थ सागर चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली. अचानक बेपत्ता झाल्याने त्याचा मित्रपरिवार, सहकलाकार आणि त्याचे चाहते हैराण होते. गायब झाल्याची बातमी सगळीकडे पसरल्यानंतर, सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

“मी काही काळापासून अनेक अडचणींचा सामना करत होतो. ज्या ठिकाणी मी आहे, तिथे मी सुरक्षित आहे. मी कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांनी माझ्यासाठी खूप अडचणी निर्माण केल्या. माझं मानसिक शोषण झालं. मी ज्या ठिकाणी आहे, इथल्या लोकांनी मला खूप पाठिंबा दिला, मला मदत केली. मी एक-दोन दिवसात मीडियासमोर येऊन संपूर्ण प्रकार काय आहे ते सविस्तर सांगेन”, असं सिद्धार्थ सागरने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

‘द कपिल शर्मा शो’ आणि ‘कॉमेडी क्लासेस’ यांसारख्या शोमधून सिद्धार्थ सागरला लोकप्रियता मिळाली. कॉमेडी सर्कस, छोटे मिया बडे मिया, लाफ्टर के फटके आणि कॉमेडी सर्कस के अजूबे यांसारख्या कॉमेडी शो मध्ये त्याने काम केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number