आता या महिलेनेच केला दुसऱ्या महिलेवर #MeToo द्वारे आरोप!

#MeToo द्वारे आपल्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल महिला आता खुलेआमपणे बोलू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक नामांकीत पुरुषांबद्दल गौप्यस्फोट झाले आहेत. मात्र आता एका महिलेने दुसऱ्या महिलेवरच #MeToo द्वारे लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. कनीझ सुर्का या मुंबईतील सुप्रसिद्ध कॉमेडियन महिलेने अदिती मित्तल या प्रसिद्ध कॉमेडियनवर लैंगिक शोषणाचा आरोप केला. आपल्याबाबत घडलेला एक प्रसंग ट्विटद्वारे सांगितला. दोन […]

आता या महिलेनेच केला दुसऱ्या महिलेवर #MeToo द्वारे आरोप!

#MeToo द्वारे आपल्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल महिला आता खुलेआमपणे बोलू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक नामांकीत पुरुषांबद्दल गौप्यस्फोट झाले आहेत. मात्र आता एका महिलेने दुसऱ्या महिलेवरच #MeToo द्वारे लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

कनीझ सुर्का या मुंबईतील सुप्रसिद्ध कॉमेडियन महिलेने अदिती मित्तल या प्रसिद्ध कॉमेडियनवर लैंगिक शोषणाचा आरोप केला. आपल्याबाबत घडलेला एक प्रसंग ट्विटद्वारे सांगितला.

दोन वर्षांपूर्वी अंधेरी येथे एक कॉमेडी शोचं मी सूत्र संचालन करत होते. शेकडो प्रेक्षक आणि विनोदवीरांच्या उपस्थितीत अदिती अचानक मंचावर अवतरली आणि मला न सांगताच मंचावर तिने आपली जीभ माझ्या तोंडात घातली. या घटनेने मला खूप अपमानास्पद वाटलं. प्रत्येक व्यक्तीची एक मर्यादा असते. ही मर्यादा माझ्याबाबतीत अदितीने ओलांडली. गेल्या वर्षी मी मोठ्या हिमतीने याबद्दल अदितीला विचारलं, तेव्हा आधी तिने माझी माफी मागितली, पण नंतर तिने मला वाईट वागणूक दिली,त्यामुळे मी संभ्रमित झाले.

याबद्दल आपण अदितीला पुन्हा एकदा जाहीर माफी मागण्याबद्दल विनवलं असल्याचं कनीझने म्हटलंय.

 

या ट्विटला प्रत्युत्तर देत अदिती मित्तलने ट्विट करत कनीजची माफी मागितली आहे. मात्र याचवेळी तिने आपण तिच्या ओठांवर केवळ ओठ टेकवले होते आणि ते ही केवळ गंमत म्हणून असं स्पष्ट केलं आहे. त्यामागे कोणतीही लैंगिक शोषणाची भावना नव्हती, असंही अदितीने म्हटलं आहे आणि बिनशर्थ माफी मागितली आहे.

 

थोडक्यात एकीकडे महिला अनेक पुरुषांवर लैंगिक शोषणाचे आरोप करत असताना कोणताही पुरुष याबाबत थेट माफी मागायला तयार नाही. मात्र ज्यावेळी एका महिलेने दुसऱ्या महिलेवर असे आरोप केले, त्यावेळी दसऱ्या महिलेने आपली चूक मान्य करून माफी मागितल्याचं दिसून येतंय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number