‘मातोश्रीत येऊन दाखवा’

ठाण्यात महाविकास आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी उद्धव गटाच्या सुषमा अंधारे यांनी चंद्रशखर बावनकुळेंना प्रतिआव्हान दिले आहे. मंगळवारी ( ४ मार्च ) रोजी, उद्धव ठाकरे यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरील विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरे यांना सुनावले. मंगळवारी ( ४ मार्च ) पत्रकार परिषदेत बोलताना ‘आमच्या नेत्यांबद्दल पुन्हा […]

‘मातोश्रीत येऊन दाखवा’

ठाण्यात महाविकास आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी उद्धव गटाच्या सुषमा अंधारे यांनी चंद्रशखर बावनकुळेंना प्रतिआव्हान दिले आहे.

मंगळवारी ( ४ मार्च ) रोजी, उद्धव ठाकरे यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरील विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरे यांना सुनावले. मंगळवारी ( ४ मार्च ) पत्रकार परिषदेत बोलताना ‘आमच्या नेत्यांबद्दल पुन्हा बोललात तर मातोश्रीत घुसू’ असा थेट धमकीवजा इशारा बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना दिला. बुधवारी ( ५ मार्च ) रोजी ठाण्यातील मविआच्या सभेत भाषणादरम्यान सुषमा आसनधारे यांनी ‘मातोश्रीत येऊन दाखवा’, असे म्हणत प्रतिआव्हान दिले आहे. “बावनकुळे साहेब मी तुम्हाला आव्हान देते, हिंमत असेल तर ४८ तासात मातोश्रीत या”, असे सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.

काय बोलले होते बावनकुळे ?

“आज तुम्हाला शेवटची संधी दिली आहे. यानंतर बोललात तर लक्षात ठेवा. ही धमकी आहे, असं समजा. यानंतर तुम्ही आमच्या राज्याच्या नेत्याबद्दल बोलायचं नाही. तुम्हाला तो अधिकार नाही. तुम्ही नैराश्य आल्यामुळे असे वागत आहात, उद्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसही तुम्हाला सोडेल पण, आमच्या नेत्याला बोलाल, तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला ही आमचा शेवटची चेतावणी आहे,”

नेमकं प्रकरण काय ?

ठाण्यात शिवसेनेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी उद्धव गटाची एक महिला रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली. यानंतर, उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमवेत ठाण्यातील रुग्णालयात जाऊन त्या महिलेची भेट घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड केली. यावेळी, “एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे, अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय” “फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही”, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले होते.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number