बारसू रिफायनरी प्रकल्पाचा वाद गेले अनेक दिवस चांगलाच चिघळला आहे. अनेकांनी विविध वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याचे जोरदार पडसाद उमटताना दिसत आहेत. शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी अनेक विधाने केली असून उद्धव ठाकरेंवर चांगलीच टोलेबाजी केली आहे.
नारायण राणेंनी शनिवारच्या पत्रकार परिषदेत बोलत असताना उद्धव ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला. यामध्ये नारायण राणेंनी उद्धव आहेत कोण? असा खोचक प्रश्न करत उद्धव यांचा उध्वस्त असा उल्लेखही केला. दरम्यान, प्रकल्प विरोधकांचा आम्ही विरोध करू असेही ते म्हणाले. उद्धव यांनी अडीच वर्षात कोकणाकडे दुर्लक्ष केले. कोकणचा कॅलिफोर्निया करणारे अज्ञानी असाही उद्धव यांचा उल्लेख त्यांनी केला. ज्याला भूगोल समजत नाही, अर्थसंकल्प माहित नाही तो मुख्यमंत्री कसा काय झाला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच उद्धव ठाकरेंनी केलेला बारसूचा दौरा हा फक्त आणि फक्त त्यांनी घेतलेली सुपारी आणि जबाबदारी पार पाडण्यासाठी होता असेही ते म्हणाले. ‘लायकी नसताना पवारांच्या कृपेने मुख्यमंत्री झालास, बाळासाहेब असते तर हा मुख्यमंत्री कधीच झाला नसता, उद्धव ठाकरे हा कलंक आहे अशी खोचक टोलेबाजी राणेंनी केली. कोरोनामध्ये औषधे खरेदी केली त्यातही उद्धव ठाकरे यांनी पैसे खाल्ले असा आरोपही यावेळी करण्यात आला. ठाकरेंनी कधी एखादी बालवाडी काढली, एखादं हॉस्पिटल किंवा कंपनी काढल्याचं दिसून नाही आलण अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान ‘उद्धव यांना विरोध करणार असं म्हणत उद्धव यांना विनासुरक्षा कोकणात येऊन दाखवा मग बघू असा सूचक इशाराही त्यांनी केला.