‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी एका पोलीस अधिकाऱ्यावर संतापल्याचे पाहायला मिळाले. जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर आणि राष्ट्रीय बैठकीनंतर अभिजीत दिपके यांना भेटण्यासाठी सिडको वाळूज महानगर येथील त्यांच्या निवासस्थानी देशभरातून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तेथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी भेटण्यासाठी येणाऱ्यांची कसून चौकशी करत होते.
हेही वाचा- Abhijeet Dipke : अमेरिकन AI कंपनीकडून CJP वर हेरगिरी? अभिजीत दीपकेंच्या दाव्याने खळबळ
यादरम्यान अभिजीत दिपके यांना भेट देण्यासाठी येणाऱ्या लोकांशी पोलीस कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करत अभिजीत दिपके यांनी संताप व्यक्त केला. आपल्या निवासस्थानी भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून उद्धट वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत दिपके पोलीस अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले.
“पोलिसांनी मला सांगायचे नाही की मी कोणाला भेटायचे? मी कोणाला भेटायचे आणि कोणाला नाही, हे मी ठरवणार, तुम्ही कोणत्या विभागाचे आहात? कोणत्या पोलीस ठाण्याचे आहात? तुमचे पद काय आहे?” अशा आक्रमक शब्दांत दिपके यांनी पोलीस अधिकाऱ्याला सुनावले. तसेच तुम्ही बाहेर जा म्हणत पोलीस अधिकाऱ्याला अभिजीत दिपकेंनी घराच्या बाहेर काढले. तसेच त्यांनी हिट स्प्रे ग्रुपचा दावा करत आरोप केला आहे. यानंतर आता नवा वाद निर्माण झाला आहे.