मुंबई, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी : मुंबई विमानतळावर कस्टम्सने एका विदेशी नागरिकाकडून १२.९८ कोटी रुपये किमतीचे सुमारे १.३ किलो कोकेन जप्त केले आहे. हा प्रतिबंध ड्रग्ज या व्यक्तीने बॅगच्या पोकळीत लपविला होता. या प्रकरणी एका विदेशी प्रवाशाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे कस्टमने सांगितले. सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत परदेशातून भारतामध्ये आलेल्या नागरिकाकडून १.३ किलो कोकेन जप्त करण्यात आलं आहे. या प्रवाशाने अतिशय शिताफिने हे कोकेन बॅगेमध्ये लपवले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई एअरपोर्टवर सीमा शुल्क विभागाने १ जुलै रोजी ही कारवाई केली. एका परदेशी नागरिकाकडून सुमारे १३ किलो कोकेन जप्त झाले. या कोकेनची किंमत १२.९८ कोटी रुपये आहे. या प्रवाशाविरोधात कारवाई करत त्याला अटक करण्यात आली आहे. सीमा शुल्क विभागाकडून या व्यक्तीची चौकशी सुरु आहे. हे कोकेन आदिस अबाबा इथून भारतात आणण्यात आले होते. आरोपीने हे अमली पदार्थ कोणाकडून आणि कोणाला देण्यासाठी भारतात आणले होते याचा तपास सुरु आहे.
अटक करण्यात आलेली व्यक्ती नैनितालचा रहिवासी आहे. या व्यक्तीला भारतामध्ये कोकेन आणण्यासाठी एका महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार केलं होतं. सीमा शुल्क विभागाने अटक केलेल्या व्यक्तीने कोवेन आपल्या बंगेमध्ये लपवले होते. ते बाहेर काढतानाचा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ ट्रीट केला आहे.
विशेष म्हणजे याच वर्षी जानेवारी महिन्यातही सीमा शुल्क विभागाने मुंबई विमानतळावर एका व्यक्तीकडून तब्बल 28 कोटी रुपयाच कोकेन जप्त करण्यात आल होते. दरम्यान, मुंबईत नाकोटिक्स कंट्रोल ब्युरोने जूनमध्ये कारवाई केली होती. नाकोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईच्या डोंगरीच्या एएमआर रिजनमधील अमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. या कारवाईमा तस्कराकडून 50 कोटी रुपये किमतीचे 20 किलो अमली पदार्थ जप्त केले होते.