तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले

जय महाराष्ट्र, मुंबई भारतीय तटरक्षक दलाचे एक हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे रायगड जिल्ह्यातील मुरुड जवळ कोसळले. या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. मुरुड जवळच्या नांदगाव येथे लॅंडिंग करत असताना हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमधून 4 जण प्रवास करीत होते. यात महिला पायलट गंभीर जखमी झाली असून 3 किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेनंतर मुरुडचे पोलीस निरीक्षक किशोर […]

तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले

जय महाराष्ट्र, मुंबई

भारतीय तटरक्षक दलाचे एक हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे रायगड जिल्ह्यातील मुरुड जवळ कोसळले. या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत.

मुरुड जवळच्या नांदगाव येथे लॅंडिंग करत असताना हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमधून 4 जण प्रवास करीत होते. यात महिला पायलट गंभीर जखमी झाली असून 3 किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनेनंतर मुरुडचे पोलीस निरीक्षक किशोर साळे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. तटरक्षक दलाचे विशेष पथकही याठिकाणी दाखल झाले. यानंतर अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील चारही वैमानिकांना, हेलिकॉप्टरने मुंबईतील नौदलाच्या रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, मुरुडचे तहसीलदार उमेश पाटील हे घटनास्थळी पोहोचले असून अपघाताची माहिती घेत आहेत. अपघात नेमका कशामुळे घडला, याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number