CNG Price Hike: मोठी बातमी! सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री, सीएनजीचे दर वाढले; प्रवास महागाईचं सावट

कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस च्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. 

CNG Price Hike: मोठी बातमी! सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री, सीएनजीचे दर वाढले; प्रवास महागाईचं सावट

आखाती युद्ध सुरू झाल्यापासून इंधन टंचाईचं सावट निर्माण झालं आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळत आहे. अशातच आता पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे शहर आणि परिसरात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस च्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. 

या दरवाढीमुळे रिक्षाचालक आणि खासगी वाहनचालकांना आता आर्थिक फटका बसणार आहे. नव्या दरांबाबतचे अधिकृत प्रसिद्धीपत्रक 'एमएनजीएल'कडून जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो 1 रुपया 50 पैशांची वाढ जाहीर केली आहे.

गॅस टंचाईचे हे काळे ढग निवळत असल्याचे वाटत असतानाच अचानक करण्यात आलेल्या या दरवाढीने वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होणार आहे.  एमएनजीएलने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात आता सीएनजीसाठी वाहनचालकांना प्रति किलो 92 रुपये 25 पैसे मोजावे लागणार आहेत. यापूर्वी सीएनजीचे दर 90 रुपये 75 पैसे प्रति किलो इतके होते. नव्या दरांबाबतचे अधिकृत प्रसिद्धीपत्रक 'एमएनजीएल'कडून जाहीर करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा असलेल्या रिक्षांच्या भाडेवाढीचा प्रश्न यामुळे पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number