मुंबईच्या मेट्रो कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे श्रेयवादाचे दावे

गुढीपाडव्याचे औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ या दोन्ही मार्गिकेचे उद्घाटन केले आहे. दरम्यान, मुंबईच्या मेट्रो कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रेयवादाचे दावे केले आहेत. तसेच जे केले नाही त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी मेट्रो कार्यक्रमात केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा दिवस हा […]

मुंबईच्या मेट्रो कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे श्रेयवादाचे दावे

गुढीपाडव्याचे औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ या दोन्ही मार्गिकेचे उद्घाटन केले आहे. दरम्यान, मुंबईच्या मेट्रो कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रेयवादाचे दावे केले आहेत. तसेच जे केले नाही त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी मेट्रो कार्यक्रमात केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा दिवस हा माझ्यासाठी आपल्या सर्वांसाठी आनंदाचा असून निर्बंधमुक्तीचा आपला हा पहिलाच दिवस आहे. सकाळपासून चार कार्यक्रमांचे लोकार्पण केले. त्यातील दोन ऑनलाईन आणि दोन प्रत्यक्षात. राज्यात मास्कस्कतीतून सुटका मिळाली आहे मात्र मास्कमुक्तीतून नाही. त्यामुळे जोवर मी आणि उपमुख्यमंत्री मास्क घालत आहेत तोवर आपणही मास्क घालावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

कोरोना नंतर एक साथ आली, एकतर तुम्ही काही केले नाहीत जे काही केले ते आम्हीच केले, त्यातूनह नवीन काहीतरी केले तर त्यात भ्रष्टाचार केला आहे. अशी एक नवीन साथ आली आहे. लक्षणे सगळी एकत्र होतात, असे जे काही रुग्ण आहेत त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच आम्ही काय करतोय तुम्ही काय करत आहेत, हे जनता बघत आहे, असेही ते म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number