‘ती’ बैठक संपल्यानंतर बंद दारआड मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे बोलत तरी काय होते?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   रत्नागिरीतील नाणार प्रकल्पासंदर्भात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र नाणारची बैठक संपताच या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड सुमारे 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा तपशील समजू शकला नाही.  यावेळी त्यांच्यासोबत नाणार रिफायनरीला विरोध करणारे स्थानिक ग्रामस्थांचे शिष्टमंडळ तसेच […]

‘ती’ बैठक संपल्यानंतर बंद दारआड मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे बोलत तरी काय होते?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रत्नागिरीतील नाणार प्रकल्पासंदर्भात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र नाणारची बैठक संपताच या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड सुमारे 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा तपशील समजू शकला नाही.

 यावेळी त्यांच्यासोबत नाणार रिफायनरीला विरोध करणारे स्थानिक ग्रामस्थांचे शिष्टमंडळ तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार अनिल परब, वैभव नाईक, राजन साळवी आणि मिलिंद नार्वेकर या बैठकीला उपस्थित होते.

बैठकीपूर्वी उध्दव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला विरोध दर्शवणाऱ्या नागरीकांचे पत्रांचे गठ्ठे मुख्यमंत्र्यांना देत स्थानिकांसह शिवसेनेचाही या प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगितले.या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उध्दव ठाकरे यांच्यात सुमारे 20 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number