मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया होणार?

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेचे दुखणे पुन्हा बळावले आहे. मागील आठवड्यापासून मुख्यमंत्र्यांना मानेचा त्रास सुरू झाला आहे. तसेच त्यांच्या मणक्यातही वेदना होत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्यावर येत्या काही दिवसांत शस्त्रक्रिया होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्र्यांची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.   […]

मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया होणार?

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेचे दुखणे पुन्हा बळावले आहे. मागील आठवड्यापासून मुख्यमंत्र्यांना मानेचा त्रास सुरू झाला आहे. तसेच त्यांच्या मणक्यातही वेदना होत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्यावर येत्या काही दिवसांत शस्त्रक्रिया होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्र्यांची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

  पंढरपूरमधील पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजनाच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन हजेरी लावली. मात्र पंढरपूरच्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा लावलेला दिसला. मुख्यमंत्र्यांना मागील काही दिवसांपासूनच मणका आणि मानेचा त्रास जाणवू लागला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आरोग्य तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र आता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांवर मणक्याची शस्त्रक्रिया एच. एन. रिलायन्स रुग्णालयात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number