मुख्यमंत्र्यांनीच मलिकांविरूद्ध एफआयआर दाखल करावी – आशिष शेलार

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत असलेले संबंध उघड केले आहेत. यावर, मी उद्या सकाळी अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे मलिकांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात स्वत:च एफआयआर दाखल करून याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजप नेते ऍड.आशिष शेलार यांनी केली आहे.   देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत […]

मुख्यमंत्र्यांनीच मलिकांविरूद्ध एफआयआर दाखल करावी – आशिष शेलार

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत असलेले संबंध उघड केले आहेत. यावर, मी उद्या सकाळी अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे मलिकांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात स्वत:च एफआयआर दाखल करून याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजप नेते ऍड.आशिष शेलार यांनी केली आहे.

  देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांवर हल्लाबोल केला. फडणवीस यांनी केलेले सर्व आरोप मलिकांनी मान्य केल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच संपूर्ण इमारत कमी किंमतीत कशी मिळाली? नवाब मलिक सामान्य जनतेला मूर्ख समजतात का? असा सवाल आशीष शेलार यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: एफआयआर दाखल करत याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

जमीन सौद्यावर फडणवीसांचे प्रश्न

  नवाब मलिकांनी बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी मलिकांवर केला आहे. त्यामुळे मुंबईच्या खुन्यांकडून जमीन घेण्याची गरज काय? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे. तसेच जमीन कावडीमोलाने मलिकांना का मिळाली? टाडा आरोपींची संपत्ती सरकारजमा का नाही? आणि जमिनीच्या व्यवहारात काळा पैसा वापरला? असे प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत उपस्थित केले आहेत. याबाबतचे सर्व पुरावे राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number