दोन शिफ्टमध्ये काम करा, पण 5-6 दिवसांत तूर खरेदी पूर्ण करा- मुख्यमंत्री

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. दोन शिफ्टमध्ये काम करुन पाच ते सहा दिवसांत तूर खरेदीची प्रक्रीया पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.   अमरावतीमध्ये सर्वाधिक तूरखरेदी बाकी असल्याने त्या भागात केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. राज्यात यंदा मोठ्या प्रमाणावर तुरीचे उत्पादन झाल्याने बाजारात […]

दोन शिफ्टमध्ये काम करा, पण 5-6 दिवसांत तूर खरेदी पूर्ण करा- मुख्यमंत्री

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. दोन शिफ्टमध्ये काम करुन पाच ते सहा दिवसांत तूर खरेदीची प्रक्रीया पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

 

अमरावतीमध्ये सर्वाधिक तूरखरेदी बाकी असल्याने त्या भागात केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. राज्यात यंदा मोठ्या प्रमाणावर तुरीचे उत्पादन झाल्याने बाजारात तुरीचे भाव पडले आहेत.

 

यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने बाजार हस्तक्षेप योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यांतर्गत हमी भावानुसार तूरखरेदी केली जाणार आहे.

 

सरकारने 40 लाख क्विंटल तुरीची खरेदी केली असून केंद्रावर उर्वरित नोंदणी झालेल्या तुरीची खरेदी प्रक्रिया सुरु आहे. तूर खरेदीची प्रक्रिया गतिमान करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number