अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा अखेर स्थगित

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई शिवसेनेसह विरोधक आक्रमक झाल्यानंतर अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला ‘मेस्मा’ कायदा मुख्यमंत्र्यांनी स्थगित केला. सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ लावण्यावरून बुधवारी विरोधकांनी सरकारला विधिमंडळात चांगलंच धारेवर धरलं होतं. राज्याच्या ग्रामीण भागातील गर्भवती महिला आणि बालकांच्या पोषण व्यवस्थेच्या संदर्भात अंगणवाडी सेविकांचे महत्त्वाचे काम असून, त्यामुळेच […]

अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा अखेर स्थगित

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

शिवसेनेसह विरोधक आक्रमक झाल्यानंतर अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला ‘मेस्मा’ कायदा मुख्यमंत्र्यांनी स्थगित केला. सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ लावण्यावरून बुधवारी विरोधकांनी सरकारला विधिमंडळात चांगलंच धारेवर धरलं होतं.

राज्याच्या ग्रामीण भागातील गर्भवती महिला आणि बालकांच्या पोषण व्यवस्थेच्या संदर्भात अंगणवाडी सेविकांचे महत्त्वाचे काम असून, त्यामुळेच अंगणवाडी सेविकांनी संप पुकारल्यास त्यांना ‘मेस्मा’ लावण्याची तरतूद करण्यात आली होती. परंतु आता तो कायदाच स्थगित करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number